*मार्कंडा देवस्थानातील पुण्यतिथी महोत्सवाला खासदार अशोकजी नेते यांची भेट*… ———————————————- चामोर्शी:- दिं.२९जानेवारी २०२३ चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे विश्वप्रभू श्री.संत जीवनदास बाबांच्या कृपाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सव आयोजित केलेला होता. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रकाशजी गेडाम यांचे सुध्दा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमाप्रसंगी भाविकभक्तांना मोलाचा संदेश देऊन आध्यात्मिकतेने मन, शांत,आनंदित प्रफुल्लित राहते,त्यामुळे दिंडी,पालखी,भागवत सप्ताह,भजनपुजन,अशा अध्यात्मिकतेच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे काळाची गरज आहे.असे याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी संदेश दिला. यावेळी खासदार अशोकजी नेते, प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश जी गेडाम,प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, डेडूजी राऊत, एस.टी मोर्चाचे महामंत्री तथा माजी पं.समिती सदस्य रेवनाथजी कुसराम, भाऊजी दहेलकर,तसेच अनेक भाविक भक्त उपस्थित होते. तसेच मार्कंडा देवस्थानावरून येत असतांना चामोर्शी येथील माता मंदिराला खासदार अशोकजी नेते यांनी भेट दिली असता या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.

44

मार्कंडा देवस्थानातील पुण्यतिथी महोत्सवाला खासदार अशोकजी नेते यांची भेट
———————————————-
चामोर्शी:- दिं.२९जानेवारी २०२३

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे विश्वप्रभू श्री.संत जीवनदास बाबांच्या कृपाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सव आयोजित केलेला होता.

या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रकाशजी गेडाम यांचे सुध्दा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमाप्रसंगी भाविकभक्तांना मोलाचा संदेश देऊन आध्यात्मिकतेने मन, शांत,आनंदित प्रफुल्लित राहते,त्यामुळे दिंडी,पालखी,भागवत सप्ताह,भजनपुजन,अशा अध्यात्मिकतेच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे काळाची गरज आहे.असे याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी संदेश दिला.

यावेळी खासदार अशोकजी नेते, प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश जी गेडाम,प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, डेडूजी राऊत, एस.टी मोर्चाचे महामंत्री तथा माजी पं.समिती सदस्य रेवनाथजी कुसराम, भाऊजी दहेलकर,तसेच अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

तसेच मार्कंडा देवस्थानावरून येत असतांना चामोर्शी येथील माता मंदिराला खासदार अशोकजी नेते यांनी भेट दिली असता या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.