महिलांनी नियमित योगा करून आरोग्यमय जीवन जगावे     माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

100

महिलांनी नियमित योगा करून आरोग्यमय जीवन जगावे

माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

 

*नवेगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम*

गडचिरोली :- दि.29 जाने.

*योग गुरु रामदेव बाबांनी सर्व नागरिकांना नियमित योगा करण्याचा संदेश दिला आहे महिलांनी यात मागे न राहता आपल्या उत्तम आरोग्यासाठी योगा शिकून नियमित योगा करून निरोगी जीवन जगावे. योगामुळे शरीर निरोगी राहत असल्याने महिलांनी नियमित योगा करण्यावर भर द्यावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे. महिलांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहण्याची ग्वाही यावेळी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी दिली. महिला पतंजली योग समिती नवेगाव च्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.*

*महिला पतंजली योग समिती नवेगाव, गडचिरोलीच्या वतीने नवेगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली महिला योग समिती नवेगावच्या अध्यक्षा वसुधा बोबाटे, सदस्या भारती पोहरकर, सहारे काकु, चन्नावार, रोशनी चलाख उपस्थित होते.*

*याप्रसंगी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा केला यावेळी नवेगाव येथील महिला,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*