न्यूयान क्रिकेट क्लब डोंगरगांव (भु.) ता.आरमोरी जिल्हा गडचिरोली यांचे सौजन्याने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांचे हस्ते संपन्न झाले
*युवकांनी जिद्दीने, चिकाटीने, एकाग्रतेने खेळ खेळावे खासदार अशोकजी नेते यांचे उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन…*
———————————————–
दिं.०५ फेब्रुवारी २०२३
आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील न्युयान क्रिकेट क्लब डोंगरगांव भु.येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेे होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना युवकांनी मैदानी खेळ खेळतांना जिद्दीने,चिकाटीने,आनंदाने एकाग्रतेने खेळ खेळावे.,खेळामुळे युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते.क्रिकेट या खेळामध्ये पंचाची भुमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे स्पर्धकांने पंचानी दिलेला निर्णय अंतिम म्हाणून वादविवाद न करता चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने खेळाचे आयोजन करावे. असे प्रतिपादन या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून क्रिकेट मैदानात फीत (रिबीन)कापून या क्षेत्राचे लाडके खासदार अशोकजी नेते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
यावेळी खासदार महोदयांनी स्वतः खेळ खेळून बॅटिंग करून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे सर,छायाताई खरकाटे सरपच्या, लोमेश सहारे उपसरपंच्, विकास पायदलवार भाजपा युवा वारियर्स तालुका अध्यक्ष आरमोरी, पत्रकारचा संस्कार विलाश चिलबुले, विट्ठल पेट्टेवार, मंडलवार भाऊ, सरपंच ठाणेगांव, गोपाल भाडेकर,भाग्यवान खोबागडे साहेब, मनोज पाचलवार,चेतन भोयर, प्रविन ठेंगरी,सचिन कुथे, चेतन पाचलवार, राकेश नारदेलवार, गुरुचरन आलेवार, डबाजी सामतवार,तसेच गावकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





