*एटापल्ली तालुक्यातील एकरा बु येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*
*आदिवासी क्रिडा मंडळाकडून कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन*
*एटापल्ली*….तालुक्यातील एकरा बु येथे आदिवासी क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून गाव भूमिया रमेश धुर्वा तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारुजी रापंजी, प्रणयजी खुणे ( कंत्राटदार ), माजी प.स.सदस्य मंगेश हलामी,माजी प.स.सदस्य रमेश तोरे माजी,माजी प.स.सदस्या संगीताताई धुर्वा, सादू गावडे माजी सरपंच, गावडे सर सेवानिवृत्त शिक्षक, मुन्नीबाई आत्राम ग्रा. प. सदस्य,बाबुराव गावडे, मधुकर मडावी, आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,भटपल्लीवार सावकार, कन्नाजी नरोटे, सदू धूर्वा, सतीश हलामी, सुरेश धुर्वा,डोलू पुंगाटी, मंगेश धूर्वा, दासरवार सर, पूल्लीवार मॅडम, कागदेलवार मॅडम,विनोद कावेरी,जुलेख शेख, सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यासह या दोन्ही सामन्यासाठी इतर मान्यवरांकडून अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.
एकरा बु येथील आदिवासी क्रीडा मंडळाकडून आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे यशस्वीतेसाठी सतीश आत्राम,सुरेश दुर्वा,रुपेश आत्राम,रावजी दोरपेटी,दत्तू उसेंडी,कना मत्तामी,नानेश दुर्वा,सतीश हलामी यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी पं.स.सदस्य रमेश तोरे यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला एकरा बु सह तोडसा ग्राम पंचायत परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.



