*आलापल्ली मुख्य चौकात भाग्यश्री ताई आत्राम ह्यांच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप*
आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळ तसेच स्वराज फाउंडेशन आलापल्ली जिल्हा गडचिरोली तर्फे महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना दूध केळ व फराळाचं विविध सामान च वाटप करण्यात आले यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) तसेच आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम ,पराग पांढरे ,अतुल आत्राम, मनोज दुर्वे ,महेश येरावार, आलापल्ली व्यापारी संघटना तसेच स्वराज फाउंडेशन आलापल्ली व आलापल्ली चा लाडका राजा यांचे सर्व सदस्य उपस्थित होते. आलापल्ली व आलापल्ली परिसरातील भाविकांनी येथील फराळ व दूध वाटपाचा भरपूर आस्वाद घेतला.






