*खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने मार्कंडा यात्रा येथील दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी मंजूर*
——————————————–
*नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी केलेल्या प्रयत्नांच्या मागणीला यश*
———————————————–
*दिनांक २२ फेब्रुवारी २०२३*
*चामोर्शी:- विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा यात्रा हि मागील दोन वर्ष कोरोणाच्या महामारी ने भरली नाही. पण दोन वर्षांनंतर या वर्षी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरहर महादेवाच्या गजरात मोठ्या उत्साहात भरली आहे यात्रेत पवित्र स्नान करण्यासाठी भगवान महादेव दर्शन करण्यासाठी विविध भागांतून काना कोपऱ्यातील भाविक भक्त यांचा जनसागर लोटला आहे परंतु प्रशासनाच्या अडीअडचणी च्या धोरनामुळे सध्या दोन तीन दिवसा पासून पोलीस प्रशासन रात्री साडे दहा वाजता दुकाने बंद करीत आहेत, त्यामूळे बाहेर गावून रात्री येणाऱ्या भाविक भक्तांना आल्या पावलांनी वापस जावे लागत असून या बद्दल जनते मधे प्रचंड रोष व्यक्त होत होता,आधीच दोन वर्षां पासून जनतेचे संसार कोरोना महामारी मुळे उघड्यावर आले होते, मात्र या जत्रेच्या निमित्ताने अनेक गोरगरीब दुकानदार,पानटपरीवर वाले असे अनेक जन पोटाची खळगी भरण्यासाठी छोटी मोठी दुकाने थाटतात व त्यांना रोजगाराची या यात्रेमध्ये संधी प्राप्त होते. मात्र प्रशासनाच्या या धोरणामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला होता येथील शेकडो दुकानदार व्यवसायी बाहेर राज्यातून आलेले झुले,मौत का कुवा,छोटे दुकानदार, व्यवसाय न झाल्याने व यात्रेत सहभागी झालेले लाखो भाविक भक्त रात्री साडे दहा पर्यंत सर्व दुकान बंद केल्याने यात्रेतील भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वंचित राहता येत आहे. चहा तर खूप दूरची गोष्ट आहे रात्री साडे दहा वाजता नंतर संपूर्ण यात्रा ओस पडत होती? सदर यात्रेतील दुकानांना किमान बारा वाजता पर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या कडे आज नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी केली काल या विषयावर येथील स्थानिक गोरगरीब दुकानदार संघटना व बाहेर राज्यातून आलेले झुले ,मौत का कूवा, व छोटे चहा,पान ठेला व्यवसायी यांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर या विषयावर चर्चा केली व तक्रार अर्ज दिला तक्रारीची दखल घेऊन नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी सदर समस्या जाणून येथील पोलिस निरीक्षक खांडवे साहेब यांची तत्काळ भेट घेतली होती व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या सोबत थेट चर्चा केली व आज या विषयावर व पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते व आज खासदार अशोकजी नेते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सोबत दुरध्वनी द्वारे सविस्तर चर्चा केली व रात्री बारा वाजेपर्यंत यात्रा सुरू ठेवण्याची मागणी मंजूर केली. यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे ,अशोक धोडरे , भैय्याजी गडकर ,रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*




