*राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना रावणवाडी ता.वडसा येथे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करतांना खासदार अशोकजी नेते*.
दिं.०५ मार्च २०२३
वडसा:- वडसा तालुक्यातील रावणवाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मूर्तीदाते खासदार महोदयांनी या मंडळाला मूर्तीची स्थापना करण्यासाठी दिली.व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा दि.२५/०२/२०२३ ला खासदार महोदयांचे हस्ते आयोजित केलेला होता. परंतु खासदार महोदय बाहेरच्या दौऱ्यावर असल्याने या अनावरण सोहळयाला येऊ शकले नाही. परंतु या क्षेत्राच्या दौऱ्याप्रसंगी आज दिनांक.०५ मार्च २०२३
मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन रावणवाडी ता.वडसा येथे त्यानिमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी या थोर राष्ट्रसंताला विनम्र अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोकजी नेते,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश जी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल भाई कुकरेजा,सामाजिक नेते नानाभाऊ नाकाडे,भाजपाचे रुषी पा.गायकवाड, बुथप्रमुख गोपाल नाकाडे,बुथप्रमुख मेघश्याम डांगे, बुथप्रसचिव गुरुदेव नाकाडे,बुथसचिव हिराजी नाकाडे,उपसरपंच कोरेगांव धनंजय तिरपुडे,विश्वनाथ कोहळे, दुर्गाताई कोहळे,वासंतीबाई नाकाडे, शिला डांगे,तसेच गुरुदेव सेवा भजनी मंडळी रावणवाडी. उपस्थित होते.





