दिव्यांगंना मोफत कॅलीपर तथा जयपुर फुट वितरण शिबिराची सुरुवात – जैन भवन तुडुंब, पहिल्याच दिवशी 400 दिव्यांगांनी घेतला लाभ
श्री शांतीनाथ सेवा मंडळ, रुरल इलेक्ट्रशियन कारपोरेशन लिमिटेड, सकल जैन समाज चंद्रपूरचे विशाल आयोजन – आठवडाभर चालणार दिव्यांग सेवा शिबिर
मागिल कित्येक वर्षांपासून माजी खा. नरेश बाबु पुगलिया ह्यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथिल श्री शांतीनाथ सेवा मंडळ, रुरल इलेक्ट्रशियन कारपोरेशन. सकल जैन समाज तथा महावीर विकलांग सेवा समिती जयपुर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खा. नरेश बाबु पुगलिया ह्यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षीही 20 मार्च ते 27 मार्च दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन जैन भवन, पठाणपुरा रोड येथे आज दिनांक 20 मार्च रोजी जैन सेवा समितीच्या अध्यक्षा शकुंतला बांठीया ह्यांच्या अध्यक्षतेत शिबिराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले ह्यावेळी चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले तसेच गडचिरोली येथिल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुळे, मुंबईचे डॉ.DK मेहता व जयपुर येथील नारायण व्यास, योगेश भंडारी डॉ. महावीर सोईतकर, निर्दोष पुगलिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनावेळीच जैन भवन लाभार्थी दिव्यांग भांधवांनी तुडुंब भरून गेले होते. उद्घाटन समरंभ आटोपताच दिव्यांग बांधवांची तपासणी तसेच गरजेनुसार कॅलिपर, जयपुरी पाय तसेच कुबड्यांचे मोफत वितरण सुरू झाले असुन पहिल्याच दिवशी तब्बल 400 दिव्यांग बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला.
पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले ते गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे ह्यांनी शिबिरासाठी केलेले अमूल्य सहकार्य.ह्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 200 गरजु दिव्यांग बांधवांना शिबिरात आणले व त्यांना मोफत साहित्य मिळवुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.
ह्यावर्षी हे शिबिर विदर्भ स्तरावर घेण्यात घेत असुन ह्या शिबिराचा लाभ चंद्रपूर सह यवतमाळ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगिनींना होणार आहे. 20 ते 27 मार्च दरम्यान सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. नियोजनाप्रमाणे पाहिले तिन दिवस चंद्रपूर जिल्हा, 23 व 24 मार्च यवतमाळ तसेच 25 ते 27 मार्च गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आले असुन काही कारणास्तव कुठल्याही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव नियोजित दिवसव्यातिरिक्त इतर दिवशी आल्यास त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले असुन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष जैन, राज पुगलिया, संदीप बाठीया, अशोक बोथरा, जितेंद्र चोरडिया, प्रशांत बैद, अनिल बोथरा, सुनील पंचोली, नरेश तालेला, जितेंद्र मेहेर, गौतम कोठारी, अभय ओसवाल, अमित पुगलिया, सुरेंद्र बाठीया, डॉ. सोनोले, सतपाल जैन,राजश्री बैद, अर्चना मुनोत, दर्शना मोदी, लीलावती जैन, सरला बोथरा, व यांचेसह सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे.






