Home गडचिरोली दिवसभर कृषी पंप व घर गुती विद्युत बंद असल्याने  शिवसेनेच्या नेतृत्वात...

दिवसभर कृषी पंप व घर गुती विद्युत बंद असल्याने  शिवसेनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी केला विद्युत पॉवर हाऊस ला रात्रौ 8ते 10 वाजे पर्यंत केला घेराव

82

दिवसभर कृषी पंप व घर गुती विद्युत बंद असल्याने

शिवसेनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी केला विद्युत पॉवर हाऊस ला रात्रौ 8ते 10 वाजे पर्यंत केला घेराव

 

कुरखेडा(गडचिरोली) … गेल्या चार पाच दिवसा पासून चिखली तलेगाव चांदागड नान्ही वडेगाव या परिसरातील कृषीपंप ची व घरगुती विद्युत दिवस दिवस बंद राहत होती विद्युत बंद असल्याने धान पिक वळण्याच्या मार्गावर आहेत घरगुती विद्युत ऐन स्व्यपाकाच्या जेवणाच्या वेळेवर जात असल्याने आणि उन्हाळ्याच्या उकाड्याने लोक त्रस्त झाल्याने आणि विद्युत कार्यालयाला दिवस भरा पासून फोन लावून कोणत्याही प्रकरचे प्रतिसाद न दिल्याने शेतकरी चिडले आणि विद्युत कार्यलयावर मोर्चा वळविला आस पास च्या परिसरातील चिखली आणि नानही चांदागड गोठणगाव परिसरातील शेतकऱ्यानी दूरध्वनी द्वारे माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल तालुका प्रमुख आशिष काळे उपसरपंच राष्ट्रवादी नेते राम लांजेवार सभापती जयेंद्र चंदेल यांना दिली लगेच शेकडो च्या संख्येने शेतकरी ट्रक्टर द्वारे कुरखेडा विद्युत कार्यालयावर पहोचले तेव्हा उप कार्यकारी अभियंता मुरकुटे मिळाले नाही तेव्हा काही शेतकऱ्यांनी मोर्चा त्यांच्या घराकडे वळविला पण तिथे ही मिळाले नाही कोणतेच अधिकारी कर्मचारी प्रतीसाद न दिल्याने शेतकरी संतप्त झाले शेतकरी विद्युत कार्यालयावर पहोचल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी झरकर साहेब पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे पोलिस ताफ्या सहित विद्युत कार्यालयावर पोहचले या प्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आशिष काळे नगर परिषद सभापती जयेंद्र चंदेल उपसरपंच राम लांजेवार गजू भोयर खुशाल बनसोड यांच्याशी चर्चा केली शेतकरी विद्युत पुरवठा सुरू झाल्या शिवाय हटणार नसल्याची भूमिका घेतल्याने पोलीस अधिकार्याणी विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विद्युत पुरवठा कृषी चा आणि घर गूती पूर्ववत सुरू झाला या नंतर सर्व शेतकरी आपआप ल्या गावी निघून गेले या रात्रौ च्या आंदोलनात चिखली चे पूरशोतम तिरगंम वासुदेव बहेट्वार नानी येथील घिसू पाटील खूने खुशाल बनसोड राजेश उइके चांदागड चे हुकरे प्रवीण खडसे अशोक कंगाली भावेश मुंगांकर आणि सातशे ते आठशे शेतकरी उपस्थित होते

Don`t copy text!