*बिरसा मुंडा सार्वजनिक उद्घाटन व लोकार्पण सोहळा*
आज दिनांक 14/04/2023 रोजी गडचिरोली सारखे अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये लोकशाही व शांततेच्या मार्गाने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असणाऱ्या समाजाचा विकास होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम राबवले जात असतात. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून दुर्गम भागातील विद्यार्थी युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती मिळावी तसेच गाव पातळीवर वाचनालयाची सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याची जाणीव झाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली *पोलीस ठाणे एटापल्ली येथे सार्वजनिक वाचनालयाची* निर्मिती करण्यात आली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून आज रोजी सदर वाचनालयाचा उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन *श्री ज्ञानेश्वर सखारामजी कोवे गुरुजी (आदर्श सेवानिवृत्त शिक्षक तथा अध्यक्ष गायत्री परिवार)* यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तत्पुर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ दिंडीची सुरुवात पोलीस ठाणे एटापल्ली येथून काढण्यात आली व गावातून तसेच मुख्य बाजारपेठेतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दरम्यान संविधान चौक येथे जाऊन जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व संविधान चौकातील नामफलकाचे अनावरण मा श्री कुमार चिंता सर,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा कार्यक्रमास मा श्री कुमार चिंता सर अपर पोलीस अधीक्षक प्रशासन, मा श्री यतीश देशमुख सर अपर पोलीस अधीक्षक अहेरी, मा श्री शुभम गुप्ता सर उपविभागीय अधिकारी एटापल्ली, मा श्री शेखावत सर सेकंड इन कमांड सीआरपीएफ, मा डॉ श्री सुदर्शन राठोड सर उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली उपस्थित होते. वाचनालय उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी *संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन* करण्यात आले. उपस्थित मान्यवर यांनी नागरिक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले, वाचनाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त मुलांनी वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच तरुणांनी अभ्यास करून प्रशासकीय सेवेत यावे असे आवाहन केले व
वाचनालयाच्या रूपाने एटापल्ली तालुक्यांतील विद्यार्थ्याना त्यांचे भविष्य उज्वल करता येईल असे मत त्यांनी मांडले.
या लोकार्पण सोहळ्याला तालुक्यातील दुर्गम भागातून नागरिक व विविध शाळांमधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसमुदाय (700 ते 800).
उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*वाचनालयासाठी पुरविण्यात आलेली सुविधा-*
1) सुसज्ज हॉल*( विद्युत जोडणी फॅन 06, ट्यूबलाइट-10 साहित्यसह)
2) स्वतंत्र अभ्यासिका व वाचनालय साठी कार्यालय
3) wifi सुविधा
4) पुस्तके ठेवण्यासाठी कपाट – 02
5) व्हाईट बोर्ड क्लास करिता-01
6) 5मोठे टेबल 20 खुर्ची
7) महापुरुषांच्या प्रतिमा -5
8) वाचन पुस्तके – 600
9)भारत,महाराष्ट्र,आणि गडचिरोली जिल्ह्याचे नकाशे
10) वॉटर कुलर
11) स्त्री/ पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह
12) प्रातिनिधिक स्वरुपात सभासद ओळखपत्र- 10 विदयार्थी
पोलिस ठाणे एटापल्ली चे प्रभारी अधिकारी विजयानंद पाटील तसेच सर्व अधिकारी व अंमलदार यांनी आर्थिक सहकार्याबरोबरच श्रमदान केले. सदरचे वाचनालय निर्मितीमध्ये सुज्ञ ग्रामस्थ यांनी कपाट, खुर्ची, पुस्तके तसेच आर्थिक स्वरूपात मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी केले तर प्रस्ताविक प्रभारी अधिकारी पो नि पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांनी केले.






