Home गडचिरोली *समाजाच्या विकासासाठी संघटित होणे काळाची गरज:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम* ...

*समाजाच्या विकासासाठी संघटित होणे काळाची गरज:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम* *किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण

77

*समाजाच्या विकासासाठी संघटित होणे काळाची गरज:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम*

 

*किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण*

 

अहेरी:जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे.मात्र तो विखुरला आहे.त्यामुळे समाजाकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे समाजाची उपेक्षा कायम आहे. हक्क, कर्तव्य समजावून सांगत त्यांची जनजागृती करणे गरजेचे आहे. एकट्याने लढून मिळणार नाही. त्यासाठी एकत्रित ताकद निर्माण करणे गरजेचे आहे.आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एक संघ राहिला तर आपले प्रश्न सुटतील, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी समाजाने मतभेद बाजूला ठेवून संघटित झाले पाहिजे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.

 

ते अहेरी तालुक्यातील किष्टापूर (वेल) येथे जयसेवा स्मारक समिती द्वारा आयोजित बिरसामुंडा पुतळा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराचे स्थापना व कोया पूनेम धर्म संमेलन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.यावेळी सह उद्घाटक म्हणून माजी आ. दीपक आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, कोया पूनेम गोंडवाना महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष मंगलाताई उईके,किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी,वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम,येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे,महेश मडावी,माजी प.स.उपसभापती गीता चालूरकर,बाबुराव तोरेम,अनिल कोठारे,गणेश तलांडे,शुभम शेंडे,शंकर आत्राम, लक्ष्मण येर्रावार,तिरुपती मडावी,उपसरपंच उमेश मोहूर्ले,आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टिकोन तपासणी करून आपल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे. त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल असे प्रतिपादन केले.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.बिरसा मुंडा पुतळा व कुपार्लिंगो पुतळ्याचे अनावरण तथा कोया पूनेम पंडुम दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले.विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.समाजात असलेल्या रुढी परंपरा व कला गुणांना वाव देण्यासाठी रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंगो पूजा करून गावात रॅली काढण्यात आली. त्यानंतर सप्तरंगी ध्वजारोहण करून पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराची स्थापनाचे अनावरण सोहळा व मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य वामन मडावी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.

Don`t copy text!