Home गडचिरोली कुलरमध्ये पाणी भरताय.. सावधानता बाळगा    कुलरमध्ये पाणी...

कुलरमध्ये पाणी भरताय.. सावधानता बाळगा    कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून गमवावा लागला 27 वर्षीय महिलेला जीव

72

कुलरमध्ये पाणी भरताय.. सावधानता बाळगा

 

कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून गमवावा लागला 27 वर्षीय महिलेला जीव

 

गडचिरोली

उन्हाळा तापू लागताच सर्वत्र कुलरचा वापर सूरू झाला. परंतु कुलरमध्ये पाणी भरताना आवश्यक ती सावधानता न बाळगल्यास प्राण गमवावे लागु शकते. अशीच एक घटना गडचिरोली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगाव येथे दिनांक 17 एप्रिल सोमवारी पाच साडे पाच वाजताच्या दरम्यान घडली.

 

सौ अश्विनी राकेश मुनघाटे वय 27 वर्ष रा गोगाव ता. जि.गडचिरोली असे कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.

 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास नळ आले असताना अश्विनी हिने कुलर मध्ये पाणी टाकत होती. कुलरच्या सर्व बटण पुर्णपणे बंद न करता पाणी टाकल्यामुळे अश्विनी ला विजेचा तीव्र धक्का लागला व तीचा दुदैवी मृत्यु झाला.

 

या घटनेने गोगावं परीसरात शोककळा पसरली असून तिला दीड वर्षाची एक मुलगी असल्याचे कळते. तीच्या अशा दुदैवी निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र कुलरचा वाढला असून कुलरमध्ये पाणी टाकताना सावधानता न बाळगल्यास जीवाची हानी होऊ शकते यासाठी कुलरमध्ये पाणी टाकताना आवश्यक ती खबरदारी घेऊन कुलरची बटन पूर्णपणें बंद करूनच पाणी टाकावे. व याकडे दुर्लक्ष करु नये.

Don`t copy text!