Home गडचिरोली अधिकारीवर्गानी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवावे असे निर्देश*...

अधिकारीवर्गानी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवावे असे निर्देश* *खासदार अशोक जी नेते यांनी दिले*

82

*अधिकारीवर्गानी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवावे असे निर्देश*

*खासदार अशोक जी नेते यांनी दिले*

———————————————– *खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली तालुका धानोराची आढावा बैठक संपन्न*….

——————————————

दिं.२१ एप्रिल २०२३

 

धानोरा:-भारतीय नागरी सेवा दिनाचे औचित्य साधत कार्यक्षम व प्रामाणिक अशा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे खासदार महोदयांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा देत आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली.

तहसील कार्यालय तालुका धानोरा येथे विविध विभागाच्या अधिकारीवर्ग व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समेत खासदार अशोकजी नेते यांनी आढावा घेतला.

 

धानोरा तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या निर्देशाअन्वये आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला सर्व विभागाचे अधिकारीवर्ग प्रमुखांच्या आढावा बैठकीत खासदार अशोकजी नेते यांनी तालुक्यातील आतापर्यंत झालेल्या सर्व विकास कामांबाबत चा आढावा घेतला ,तालुक्यातील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांबाबत व समस्त प्रलंबित असलेले कामे तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले उपस्थित विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.

 

खासदार अशोकजी नेते यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीला वि.प.आमदार रामदासजी आंबटकर, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, नायब तहसीलदार वाकुडकर साहेब,माजी.जि.प.सदस्य लताताई पुन्घाटी,जेष्ठ नेते साईनाथ साळवे, उपाध्यक्ष अनिल पोहनकर,युवा नेते सारंग साळवे,युवा नेते साजन गुंडावार,नगरसेवक संजू कुंडू, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, सुभाष धाईत,सुभाष खोबरे,संजय मेश्राम, विविध विभागाचे अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी या आढावा बैठकीला उपास्थित होते.

 

उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना केन्द्र व राज्य सरकारच्या समस्त जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले.

 

या आढावा बैठकीला संबधित विभाग प्रमुख अधिकारीवर्ग अनुपस्थितीत राहुन विभाग प्रमुख अधिकारीवर्गानी आपले प्रतिनिधी पाठवले त्यांना चांगलेच धारेवर धरले. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील धानोरा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी कटिबद्ध होण्याचे निर्देश दिले.

Don`t copy text!