गडचिरोली पंचायत समितीला लवकरच मिळणार नवी वास्तू,आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे प्रयत्न

172

गडचिरोली पंचायत समितीला लवकरच मिळणार नवी वास्तू,आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे प्रयत्न

 

*गडचिरोली पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव अहवाल तातडीने सादर करण्याचे मंत्रालयाचे निर्देश*

 

*ग्रामविकास विभागाचे गडचिरोली जिल्हा परिषदेला पत्र*

 

*दिनांक १८/५/२०२३ मुंबई*

 

*गडचिरोली पंचायत समितीच्या नवीन वस्तूच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातत्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाकडे लावून धरली असून याची दखल घेत या संदर्भात तातडीने प्रस्ताव अहवाल सादर करावा असे निर्देश ग्रामविकास विभागाने गडचिरोली जिल्हा परिषदेला दिलेले आहेत त्यामुळे आता गडचिरोली पंचायत समितीच्या इमारतीला उपलब्ध निधी उपलब्ध होणार असून लवकरच गडचिरोली वासियांची या प्रशासकीय भवनाची मागणी पूर्ण होणार आहे.*

*मागणीला धरून सरकारने कारवाई सुरू केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ग्राम विकास मंत्र्यांचे आभार मानले आहे.*