*२१ मे रोजी चामोर्शी येथे भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक*

42

*२१ मे रोजी चामोर्शी येथे भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक*

 

*बैठकीला अपेक्षित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन*

 

*बालाजी मंगल कार्यालय गडचिरोली रोड चामोर्शी येथे सकाळी ११ वाजता पासून सायंकाळी ४ वा. पर्यंत चालणार बैठक*

 

*दिनांक २० मे गडचिरोली*

 

*भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक दिनांक १९ मे रोजी पुण्यात झाल्यानंतर प्रदेश कार्यकारणीच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी बैठक २१ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक चामोर्शी येथे बालाजी मंगल कार्यालय गडचिरोली रोड चामोर्शी येथे सकाळी ११ सुरू होणार असून सायंकाळी ४ वाजता बैठकीचा समारोप होणार आहे . तरी या बैठकीला अपेक्षित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे*

 

*या बैठकीला सम्पूर्ण जिल्हा कार्यकारणी, प्रदेश सदस्य, प्रकोष्ठ पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,सर्व आघाडी तालुकाध्यक्ष, महामंत्री, सर्व आघाड्यांचे जिल्हा अध्यक्ष, महामंत्री, प्रदेश सदस्य नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्र, जनप्रतिनिधि नियोजित मोदी ९ अभियान समिति अपेक्षित आहेत.*

 

*बैठकीला येताना बूथ सशक्तीकरण चा संपूर्ण अहवाल ,समितीचे फॉर्म, सरल फॉर्म सोबत आणावे. मोदी ९ या अभियानासाठी प्रत्येक तालुक्याची ४ लोकांची समिती बनवून आणावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी याद्वारे केले आहे.*