रेगडी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

28

*रेगडी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते मका खरेदी केंद्राचे उद्घाटन*

 

 

*परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा आमदार देवराव जी होळी यांचे शेतकऱ्यांना आवाहन*

 

*दिनांक २६ मे २०२३ गडचिरोली*

 

*मागील अनेक दिवसांपासून रेगडी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी असलेल्या मका खरेदी केंद्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उद्घाटन केले.*

 

*याप्रसंगी उपप्रादेशिक व्यवस्थापक कुंभार जी, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा ,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष तोंदेश तलांडे, किशोर नेवारे मुरली नेवारे किशोर मुरतेली यांचे सह सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते*

 

*यावेळी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी रेगडी परिसरातील शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले*