*मारोती कार व एआरबी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात कारमधील सहा व्यक्तींचा मृत्यू मृतक नागपूर येथील रहिवाशी*

0
45

*मारोती कार व एआरबी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात कारमधील सहा व्यक्तींचा मृत्यू मृतक नागपूर येथील रहिवाशी*

 

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

नागपूर कडून नागभीड- ब्रह्मपुरीकडे भरधाव येणाऱ्या कार व गडचिरोली वरून नागपूरकडे जाणाऱ्या एआरबी ट्रॅव्हल्स मध्ये नागभीड कांपा जवळ झालेल्या भीषण अपघातात 6 जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील चार जनांचा अपघातस्थळी तर दोघांचा उपचारासाठी नागपूरला नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. सदर अपघात दुपारी 3 च्या सुमारास झाला.

 

अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भागाचा अगदी चेंदामेंदा झालेला आहे तर ट्रॅव्हल्स समोरील भाग मोठया प्रमाणात क्षतीग्रस्त झाला. अपघातग्रस्त मारोती अल्टो कारचा क्रमांक एम एच 49 बीआर 2242 तर एआरबी ट्रॅव्हल्स चा क्रमांक एम एच 33 टी 2677 आहे.

 

प्राप्त माहिती प्रमाणे अल्टो कार चा चालक हयगयीने वाहन चालवीत असल्याने सदर अपघात घडल्याचे कळते.

 

मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (30), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (45), सर्व रा. चंदननगर नागपूर, सुनीता रुपेश फेंडर (40) यामिनी रुपेश फेंडर (09) रा. इंदिरा नगर नागपूर, प्रभा शेखर सोनवाने (35) रा लाखनी यांचा समावेश आहे. कारमधील मृतक हे ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथील

 

त्यांच्या नातेवाईकाच्या भेटीकरिता निघाले होते.

 

अपघाताची माहिती मिळताच नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री योगेश घारे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्तींना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एका मृतक महिलेला चक्क कारचा छत कापून बाहेर काढावे लागले. ट्रॅव्हल्सचा चालक राजेंद्र नकटु वैरकार (33) रा मेंडकी यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठोसरे व पोलीस निरीक्षक श्री. योगेश घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक श्री. साखरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here