बालवैज्ञानिकांनी जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्ता अंगिकारावी : सुहास गाडे

35

बालवैज्ञानिकांनी जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्ता अंगिकारावी : सुहास गाडे

इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनीचे उद्घाटन, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील १९० प्रतिकृतींचा सहभाग

गडचिरोली : देशाच्या व जिल्ह्याच्या प्रगतीसाठी विद्यार्थी योगदान देऊ शकतात. त्यामुळे बालवैज्ञानिकांनी जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्ता अंगिकारावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाळासाहेब पवार, केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे जितेंद्र दमाडिया, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, दीपक देवतळे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, मुकूंद म्हशाखेत्री, ओमप्रकाश संग्रामे, धारेंद्र आंबीलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सुहास गाडे यांनी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत होणे आवश्यक आहे. बालवैज्ञानिक ज्ञानातून चिकित्सक वृत्ती वापरून जी माहिती घेतात, तेच विज्ञान आहे. व्यवहारिक व दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचे महत्व असून प्रश्नामधूनच वैज्ञानिक निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला घाबरू नये. पूर्वी मानवाचे आयुष्यमान कमी होते. मात्र, विज्ञानामुळे ते वाढले आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी विज्ञानाचा वापर देशासाठी केला. आजही कृषी, शिक्षण, आरोग्य, प्रशासन यामध्ये विज्ञानाचा वापर करून समस्यांवर मात केली जात आहे. विज्ञान अंगिकारल्यास जीवनामध्ये बदल घडू शकतो. कृषी वैज्ञानिक डॉ. स्वामीनाथन यांनी केलेल्या प्रयोगामुळे आज अन्न व खाद्य क्षेत्रात भारत जगात आत्मनिर्भर देश म्हणून उदयास आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाऊस असून बारमाही नद्या असतानाही मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, यात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले असून जिल्ह्यातील बालमृत्यू रोखणे आवश्यक झाले आहे.विद्यार्थ्यांना आर्टीफिशीयल इन्टेलिजन्स, रोबोटिक आदी क्षेत्रात शिक्षणाच्या संधी असून उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जगाशी जोडले जाऊ शकतो. जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आजुबाजूच्या असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्जनशिलता व कतृर्त्वावर पूर्ण विश्वास ठेवून बालवैज्ञानिकांनी मिळालेल्या संधीचे सोने करून २१व्या शतकात भारताला महासत्ता बनविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर असल्याचे सुहास गाडे यांनी सांगितले.

यावेळी वासुदेव भुसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना निर्माण करणे व प्रतिभाशक्ती देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून या परिसराला डॉ. कमल रणदिवे या वैदर्भिय संशोधकाचे नाव देण्याचा मुख्य उद्देश त्यांनी कर्करोगाबद्दल केलेल्या संशोधनात असून गडचिरोली जिल्ह्यात कर्करोगाचे अधिक रुग्ण असल्याने यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता विषद केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे अध्यक्ष संजय खांडरे, नरेंद्र भोयर, विवेक हुलके, किशोर पाचभाई, अजय लोंढे, धर्मेद्र मुनघाटे, अविनाश गौरकार, दामोधर शिंगाडे, प्रियंका डांगेवार, साईनाथ अद्दलवार, हरिश बावनकर, रवी म्हशाखेत्री, सचिन फुलझेले, रुपेश बारसागडे, रुपराम निमजे, स्काऊटचे जिल्हा संघटक विवेक कहाळे, गाईडच्या निता आगलावे आदींनी सहकार्य केले.

(फोटो 🙂