*वडसा येथील भाजपा सह इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

39

*वडसा येथील भाजपा सह इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

 

केंद्रात व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपशासीत सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. बेरोजगारी, महागाईने कळस गाठला असून काँग्रेस पक्षाकडे नागरिकांचा कल वाढला असून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी *काँग्रेस विधिमंडळ गट नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार रामदासजी मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे* यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष शामभाऊ उईके, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष विकास प्रधान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विधानसभा सरचिटणीस हंसराज लांडगे, शिवसेना तालुका सचिव लूनकरण चौधरी, राधेश्यामजी पत्रे, साजन मेश्राम, सहदेव पुराम सह कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.