गटसाधन केंद्र एटापल्लीला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते ISO मानाकंन प्रमाणपत्र प्रदान
एटापल्ली – वृत्तवानी न्यूज
गटसाधन केंद्र एटापल्ली यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य,नाविन्यपूर्ण उपक्रम,गुणवत्तापूर्ण प्रशासकीय पद्धती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी, शिक्षक वर्ग, व समस्त शाळा परिवाराने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने हा ISO सन्मान मिळाला.हा सन्मान म्हणजे केवळ कार्यालयाचा नाही तर संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील शैक्षणिक चळवळीचा गौरव आहे.दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे हस्ते गट साधन केंद्र एटापल्लीला ISO मानाकंन प्रमाणपत्र गट साधन केंद्र एटापल्ली येथे ऋषिकेश बुरडकर गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी अमर राऊत उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी उपविभाग एटापल्ली,श्रीकृष्ण पेंदाम सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,विवेक नाकाडे उपशिक्षणाधिकारी,वैभव बारेकर उपशिक्षणाधिकारी, हुकरे सर समग्र शिक्षा,अरुणा बरलावार केंद्रप्रमुख, व गट समन्वयक कोवे व गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी गट साधन केंद्राची पाहणी केली.व समाधान व्यक्त केले.व कार्यालयास आवश्यक संसाधनांची पूर्तता करण्याचे आश्वासित केले.






