तुमची श्रेयवादाची लढाई गेली खड्डयात,अगोदर चांगला रस्ता लवकर कसा होईल त्या कडे लक्ष द्या : हेमंत गडकरी
गडचिरोली जिल्ह्यातील जनता पेटून उठत नाही म्हणून त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका,सध्या लोकसभेत असणाऱ्यांनी व लोकसभा सदस्य होण्याचे स्वप्न बघणार्यांनो तुमची श्रेयवादा ची लढाई गेली खड्ड्यात, अगोदर चांगला रस्ता लवकर कसा होईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले आहे.
निवडणुका जवळ यायला लागल्या की केवळ मतदारसंघाच्या लोकांकडे लग्नात व तेरावी च्या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणजे विषय संपला असे होत नाही, याउलट या मतदार संघातील लोक प्रतिनिधी वर या भागातील जनतेने वारंवार विश्वास ठेवत दिल्ली व मुंबई दाखविली मात्र या लोकप्रतिनिधींनी दिल्ली मुंबई चा झगमगाट तर सोडा असलेल्या परिस्थिती पेक्षाही अंधकारमय वातावरण तयार केलं,आता या लोकप्रतिनिधींनी भूमिपूजनाच्या व श्रेयवादाच्या भानगडीत न पडता संबधित विभाग चांगला रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारा त्रास कसा दूर होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंतीही हेमंत गडकरी यांनी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते व अहेरी सीरोंचा मतदारसघांचे आमदार व लोकसभेसाठी आतुर धर्म रावबाबा आत्राम यांना केली आहे.




