Home Breaking News विहिरगावं येथील कॅन्सरग्रस्त तरुणीला मा.आमदार.विजय वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत

विहिरगावं येथील कॅन्सरग्रस्त तरुणीला मा.आमदार.विजय वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत

132

*विहिरगावं येथील कॅन्सरग्रस्त तरुणीला मा.आमदार.विजय वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत*

 

*दिनांक: ०५/०५/२३*

*सावली (ता.प्र)*

 

*तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथिल युवती नामे.भाग्यश्री अंबादास वाकडे वय २६ वर्ष ह्या मागील काही महिन्यापासून आजारी आहेत.उपचार चालू असताना त्यांना कॅन्सर असल्याचे समजले.एवढ्या तरुण वयात त्यांना कॅन्सर झाल्याने गावात सगळीकडे हळहळ सुरु होती.*

 

*विहीरगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही बाब सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना लक्ष्यात आणून दिली.घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत.यथाशिग्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून भाग्यश्री वाकडे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली.*

 

*आर्थिक मदत विहिरगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते श्री.काशीनाथजी मोटघरे,श्री.कुसमाकर वाकडे, श्री.दिलीप फुलबांधे,यांचे हस्ते देण्यात आली, यावेळी गावकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.*

Don`t copy text!