Home Breaking News *अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची...

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

136

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी*

 

एटापल्ली तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा मुलचेराच्या वतीने तहसीलदार सर्वेश मेश्राम यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गडचिरोली ,आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 10 जून रोजी सदर अल्पवयीन मुलगी टीसी घेण्यासाठी आलापल्ली येथे गेली होती, सदर विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी जबरीने दारूपाजून अत्याचार केला .अशा आरोपींवर कोणत्याही प्रकारची दया न दाखवता कठोर शिक्षा करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सतीश पोरतेट युवा तालुका अध्यक्ष, संदीप तोरे युवा तालुका उपाध्यक्ष ,विकास नैताम नगरध्यक्ष ,केजिकराव आरके युवा तालुका मीडिया प्रतिनिधी,रमेश कूसनाके जेष्ठ सल्लागार, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी, आहे राकेश मरापे,उदव आलाम, प्रकाश आलाम,बाजीराव मडावी,गजानन आत्राम,हणमतु मडावी,करण मडावी,संतोष तोरे,सुरेश आलाम सुरज सिडाम ,निकिल आत्राम आदि उपस्थित होते.

Don`t copy text!