*भाजप महिला आघाडीच्या वतीने विसापूर कॉम्प्लेक्स येथील अंगणवाडी सेविकेचा सत्कार*
गडचिरोली :- दि. 16 जुन
*मोदी- 9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रावर जावुन उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान करणे व पोषण आहार लाभार्थीकडून पोषण आहाराबाबत माहिती जाणून घेणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.*
*याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वार्डातील अंगणवाडी केंद्र क्र. 46 च्या अंगणवाडी मदतनीस भूमिका वसंत बाबनवाडे यांचा सत्कार महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, महिला ओबीसी मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.*





