Home Breaking News *आजच्या युवा पिढीने बुद्धांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त, शिक्षित आणि संस्कारित समाज...

*आजच्या युवा पिढीने बुद्धांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त, शिक्षित आणि संस्कारित समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा:- सौ. योगिताताई पिपरे*

12

*आजच्या युवा पिढीने बुद्धांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त, शिक्षित आणि संस्कारित समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा:- सौ. योगिताताई पिपरे*

 

*संबोधी बुद्ध विहार संघर्ष नगर येथे बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन*

 

*गडचिरोली दि.१ मे 2026*

 

*आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात बुद्धांचे विचार प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. समाजामध्ये वाढत असलेला द्वेष, अन्याय आणि असमानता दूर करण्यासाठी बुद्धांनी दिलेला मध्यममार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. शिक्षण, संघटन आणि जागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची आजच्या युवा पिढीने बुद्धांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त, शिक्षित आणि संस्कारित समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे प्रतिपादन सो.योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका न.प. गडचिरोली यांनी केले.*

*संबोधी बुद्ध विहार संघर्ष नगर येथे बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.*

*सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*

*कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संबोधी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉ.योगीराज कराडे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक महाराष्ट्र सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापति न.प. गडचिरोली श्री.बाळूभाऊ टेंभुर्णे नगरसेवक न.प. गडचिरोली, श्री.केशवजी भालेराव, सुमनताई कराडे महिला मंडळ अध्यक्ष, प्रा. डांगे सर,श्री.डोंगरे सर,श्री. संजय खांडरे,श्री. संजय बोधलकर तसेच संघर्ष नगर येथील नागरिक, युवा वर्ग,महिला मंडळ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*कार्यक्रमाचे आयोजन संबोधी बुद्ध विहार समिती, संबोधि बुद्ध विहार महिला मंडळ आणि समस्त बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आले.*

Don`t copy text!