*गडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील संयुक्त मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार*
*गाणली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता पासून संमेलन*
*सर्व आघाडी व मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन*
*दिनांक २०जुन गडचिरोली*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नव वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महा जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चा व आघाडीचे संयुक्त संमेलन २३ जून रोजी ११ वाजता गानली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनाला विधानसभा क्षेत्रातील मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.*
*या संमेलनाला खासदार अशोकजी नेते,जिल्ह्याचे अध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉक्टर देवरावजी होळी , संयोजक अनिल पोहनकर यांचे सह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत*
*या संमेलनाला महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा ओबीसी मोर्चा, आदिवासी आघाडी, दलित आघाडी, बंगाली आघाडी विमुक्त भटक्या आघाडी, यांचे सह भाजपाच्या सर्वच मोर्चा व आघाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओल्लारवार, प्रमोदजी पिपरे, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, यांनीही केले आहे.*




