Home Breaking News *एटापल्ली कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी. निकालात झेंडा; तालुक्यात प्रथम-द्वितीय क्रमांक पटकावले!*

*एटापल्ली कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी. निकालात झेंडा; तालुक्यात प्रथम-द्वितीय क्रमांक पटकावले!*

12

**एटापल्ली कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी. निकालात झेंडा; तालुक्यात प्रथम-द्वितीय क्रमांक पटकावले!**

 

एटापल्ली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी २०२६ च्या एच.एस.सी. परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत तालुक्याचा मान उंचावला आहे. उत्कृष्ट निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेतील एकूण 130 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 74.61% लागला आहे. विज्ञान शाखेने 85.67% निकालासह आघाडी घेतली, तर कला शाखेचा निकाल 60% इतका नोंदविण्यात आला.

 

यंदाच्या निकालात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती विद्यार्थ्यांची गुणवत्ता. कु. विधी सुरेश तिम्मा हिने 80.67% गुण मिळवत (कला शाखा) तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ कु. अनिशा सुधाकर पुंगाटी हिने 77% गुणांसह (कला शाखा) द्वितीय क्रमांक मिळवला. विज्ञान शाखेत कु. मनस्वी राजेंद्र भसारकर हिने 69.33% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला. विद्यालयातून एकूण 2 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवली तर 6 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. आणि 59 विद्यार्थी द्वितीय तसेच 30 विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.

 

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेलं हे यश असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 

या यशामुळे एटापल्ली परिसरात उत्साहाचे वातावरण असून, पुढील वर्षात आणखी उज्ज्वल निकाल देण्याचा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

Don`t copy text!