*एटापल्ली तालुक्यातील विद्युत सेवा २४ तास चालू ठेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले.*
सध्या परिस्तिथी पाहता एटापल्ली तालुक्यात वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बहुतांश लोक बाहेर गावातून शासकीय किवा निमशासकीय तसेच बँकेच्या कामाने किवा पेट्रोल-डीझेल टाकण्याकरिता पंप वर येत असतात परंतु लाईट ये-जा करणे तसेच वीज पुरवठा बरेच वेळेस बंद राहत असल्याने हि सर्व कामे होत नाहीत त्यामुळे लोकांना या सर्व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भारत देशाला स्वतंत्र होउन आज ७५ वर्षे पूर्ण झाली असून सुद्धा हा अतीदुर्गम भाग आजहि अंधारात आहे. हि बाब अतिशय गंभीर आहे. या सर्व गोष्टींकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. या निवेदनाच गांभीर्य लक्षात घेऊन एटापल्ली तालुक्यातील विद्युत सेवा २४ तास चालू करण्यात यावे, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मा. उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी उपविभागीय कार्यालय एटापल्ली यांना देण्यात आले. यावेळेस उपस्थित श्री. मनीष दुर्गे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख एटापल्ली, श्री. अक्षय पुंगाटी युवसेना तालुका अधिकारी, श्री. नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, श्री. विनोद मडावी विभाग प्रमुख गेदा क्षेत्र तसेच शिवसैनिक उपस्थित होते.




