*एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पात्रातील अवैद्य रेती तस्करी तात्काळ बंद करण्याबाबतचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले*
*एटापल्ली* ०४/०७/२०२३:-
एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदीपात्रातुन वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती माफिया गरजू व गरीब लोकांना मनमानी दराने अवैद्य रेती विकत असल्याची बाब समोर आली. या संपूर्ण बाबीकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अश्या रेती माफियांवर शासन प्रशासनाने लक्ष घालून कठोर कार्यवाही करण्यात यावे व एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य रेती तस्करीला तात्काळ थांबवण्यात यावे अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याबाबत निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले. यावेळेस उपस्थित मनीष दुर्गे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख एटापल्ली,अक्षय पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी, सुजल वाघमारे युवासेना उपतालुका अधिकारी, रीषभ दुर्गे शिवसेना शाखाप्रमुख तोडसा तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.





