Home गडचिरोली आगग्रस्त तोगर कुटुंबाला राजे अम्ब्रीशराव महाराजांचा दिलासा

आगग्रस्त तोगर कुटुंबाला राजे अम्ब्रीशराव महाराजांचा दिलासा

12

आगग्रस्त तोगर कुटुंबाला राजे अम्ब्रीशराव महाराजांचा दिलासा

कोर्ला येथील भीषण आग दुर्घटनेनंतर आर्थिक मदतीचा हात; ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

📍 सिरोंचा प्रतिनिधी

तालुक्यातील कोर्ला गावातील लक्ष्मीबाई मलय्या तोगर यांच्या कुटुंबावर झालेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे. या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून आधारकार्ड, जन्म दाखले, जात प्रमाणपत्र, टी.सी.सह अनेक महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. सुदैवाने रेशनकार्ड स्वस्त धान्य दुकानात असल्यामुळे ते सुरक्षित राहिले.

लक्ष्मीबाई तोगर या विधवा असून त्यांच्या पतीचे सुमारे वीस वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मोलमजुरी करून आपल्या चार मुलांचा सांभाळ केला. विनोद मलय्या तोगर, शिवराम तोगर, सत्यम तोगर आणि संजय तोगर अशी त्यांच्या मुलांची नावे असून त्यापैकी विनोद, शिवराम व सत्यम यांचे विवाह झाले आहेत, तर संजय अविवाहित आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी तत्काळ तोगर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देत आधार दिला. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे तोगर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी कोर्ला गावाचे भाजपा बुथ प्रमुख बस्वय्या दुर्गम, प्रभारी गोपाल सडमेक, गजानन कलाक्षपवार, धनंजय पागे, भारत कलाक्षपवार तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

राजे साहेबांनी दिलेल्या मदतीबद्दल तोगर कुटुंबीयांसह कोर्ला ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Don`t copy text!