Home Breaking News *नागपूर नागरिक सहकारी बँकेचा 4 था वर्धापन दिन समारोह उत्साहात साजरा*

*नागपूर नागरिक सहकारी बँकेचा 4 था वर्धापन दिन समारोह उत्साहात साजरा*

88

*नागपूर नागरिक सहकारी बँकेचा 4 था वर्धापन दिन समारोह उत्साहात साजरा*

 

गडचिरोली : – दि. 11 जुलै

 

*नागपूर नागरिक सहकारी बँक शाखा गडचिरोली चा 4 था वर्धापन दिन समारोह आज दि. 11 जुलै 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे माजी संघटन मंत्री तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. रविजी भुसारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रचित सावकार पोरेड्डीवार, नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष संजयजी भेंडे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, आधार विश्व फाउंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयलवार, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे संचालक अनिलजी गोवंदानी, संचालक तुषारकांती डबले, संचालक सचिनजी कुहिकर, डॉ अमित साळवे, डॉ प्रशांत चलाख, डॉ किशोर वैद्य, डॉ अद्वय अप्पलवार , माजी नगरसेवक सतीश विधाते उपस्थित होते.*

 

*याप्रसंगी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून नागपूर नागरिक बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तदनंतर बँकेच्या नवीन ए टी एम मशीनचे लोकार्पण कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. रविजी भुसारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रचित सावकार पोरेड्डीवार, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजयजी भेंडे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवर व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.*

*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर नागरिक सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल क्षिरसागर, अधिकारी प्रशांत भालेकर, लिपिक निकेश कुकडे, निखिल पेटकर व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व परिचरिकांनी परिश्रम घेतले.*

Don`t copy text!