*शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे पार पडली*
१२/०७/२०२३ रोजी बुधवार:-
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख मा.श्री. आदित्य साहेब ठाकरे यांचा कुशल मार्गदर्शन, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश जी केदारी यांच्या सहकार्याने आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख श्री रियाज भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख मनीष दुर्गे, युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. सध्याच राजकीय वातावरण बघता संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सर्व सामान्य गोरगरीब, शेतकरी, कामगार लोकांचा पक्ष आहे. शिवसेना ही 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारा एकमेव पक्ष आहे आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पाहता पक्ष बांधणी जोमात करा तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख कामाला लागा असा सल्ला दिले तसेच शिवसेनेला याचा जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. श्री रियाज भाई शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख यांनी एटापल्ली क्षेत्रातील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार निवडून आणू आणि एटापल्ली तालुक्यातील क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू असे प्रतिपादन देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख मनीष दुर्गे, युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी, नगरसेवक नामदेव हीचामी, शहर प्रमुख राहुल आदे, उपतालुका प्रमुख दलू पुसली, विभाग प्रमुख किशोर कांदो, तालुका समन्वयक दीपक दत्ता, शाखाप्रमुख तेजस गुजलवार, विभाग प्रमुख (गटा क्षेत्र) विनोद मडावी आदी सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.





