Home Breaking News लॉईडस मेटल अँड एनर्जी प्रा.लि. सूरजागड आणि त्रिशरन अडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा.लि.पुणे,...

लॉईडस मेटल अँड एनर्जी प्रा.लि. सूरजागड आणि त्रिशरन अडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा.लि.पुणे, शाखा एटापल्ली यांच्या वतीने एटापल्ली येथील हेडरी गावात झाले ग्राम संपर्क केंद्र (व्हीलेज आऊट रीच सेंटर) चे दिमाखात उद्घाटन व मी ‘ करणार अभियान ‘ मधील उत्तीर्ण आदिवासी निरक्षर महिलांचा सत्कार

92

लॉईडस मेटल अँड एनर्जी प्रा.लि. सूरजागड आणि त्रिशरन अडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा.लि.पुणे, शाखा एटापल्ली यांच्या वतीने एटापल्ली येथील हेडरी गावात झाले ग्राम संपर्क केंद्र (व्हीलेज आऊट रीच सेंटर) चे दिमाखात उद्घाटन व मी ‘ करणार अभियान ‘ मधील उत्तीर्ण आदिवासी निरक्षर महिलांचा सत्कार

 

एटापल्ली ता.प्र.

हेडरी येथील मैदानावर लॉईडस मेटल अँड एनर्जी प्रा.लि. सूरजागड आणि त्रिशरन ॲडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरजागड लोह खनिज प्रकल्प परिक्षेत्र परिसरातील २१ गावात ग्राम संपर्क केंद्र (व्हीलेज आऊट रीच सेटर ) उघडण्यात आले या केंद्रा अंतर्गत स्थानिक गावकरी यांच्या विविध समस्या सोडवण्यात येणार आहे तसेच जुन महिन्यात गावातील निरक्षर महिलांना स्वाक्षरी शिकवण्याचे ‘मी स्वाक्षरी करणार अभियान’ हा उपक्रम राबविण्यात आला संस्थे कडून आले होते यात एकूण २१ गावातील जवळपास २०० महिलाना स्वाक्षरी शिकवण्यात आली तसेच या पैकी उत्तीर्ण १५९ महिलाना कंपनीच्या वतीने प्रमाणपत्र व भेट वस्तू देउन गौरवत सोबतच गाव पाटील, ग्राम सेविका मॅडम, सरपंच मॅडम, वनविभागाच्या वनरक्षक मॅडम यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या ग्राम संपर्क केंद्राचे उद्घाटन लॉईडस इन्फिनिटी फाउंडेशन च्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. किर्ती रेड्डी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमास त्रिशरन ॲडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.पुणे च्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम , लॉईडस मेटल लोह खनिज प्रकल्प चे श्री. साई सर, त्रिशरन ॲडवायजरी अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.पुणे चे राज्य व्यवस्थापक श्री. प्रशांत वाघमारे सर, जगदीश सर, बोराडे सर त्रिशरन फाऊंडेशन पुणे, गडचिरोली जिल्हा समन्वयक श्री मंगल मशाखेत्री सर, तालुका समन्वयक श्री. मारोती मट्टामी, संस्थेचे प्रशिक्षक श्री. पद्माकर गोरडवार सर, श्री अजय संगमवार ,अर्चना का मॅडम, शेवंता नरोटी मॅडम, वनिता मॅडम, पुरुसुलगोंदी ग्राम सेविका मॅडम, सह काही गावातील सरपंच, गाव पाटील व सर्व ग्राम संपर्क केंद्राचे विकास दुत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Don`t copy text!