नागपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांचे बॅनर फाडणाऱ्या व अंतयात्रा काढणान्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात निषेध
गडचिरोली : :-
नागपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब शिवसेना पदाधिकान्यांच्या सभेला मार्गदर्शन करण्याकरीता आले होते. सभा झाल्यानंतर नागपूर येथील भाजपा पदाधिकान्यांनी नागपूर विमानतळ परिसरातील व चौकातील बॅनर फाडून जमीनीवर फेकले, त्यानंतर पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांची प्रतिमा असलेला पुतळा तयार करुन अंत्ययात्रा काढली. याच्या निषेर्धात शिवसेना महिला आघाडी संघटिका यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस स्टेशन येथे तक्रार करुन इंदिरा चौक येथे निषेध करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष. संपूर्ण भारतामध्ये भाजपा ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या यंत्रणेचा वापर करुण विरोधी पक्षातील आमदार, खासदारांना भ्रष्टाचाराचे आरोप करुन भाजीपाल्यासारखे विकत घेत आहेत. एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० कोटीचे आरोप करते आणि दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना शपथ देऊन आपल्या विधिमंडळात स्थान देतो आणि निरम्यासारखा स्वच्छ करतो. भारतीय जनता पार्टी लोकशाही संपविण्याच्या मार्गावर आहेत. लोकशाही कधी संपणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला भाजपा चा कटकारस्थान लक्षात आला आहे. एवढा फोडफोडीचा गलीच्छ राजकारण भाजपा करीत आहे. सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजपा खालच्या स्तरावर जाऊन महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख बनवून खुर्ची टिकून राहण्यासाठी राजकारण करीत आहे.
खरच भारतीय जनता पार्टी मध्ये हिंमत असेल तर जे भ्रष्ट आमदार, खासदार आपल्या पक्षात घेतलेले आहेत त्या भ्रष्ट आमदार, खासदारांवर ईडी, सीबीआय, ईन्कमटॅक्स या यंत्रणेचा वापर करुन दाखवावा. भारतामध्ये बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, स्त्रीयांवर अत्याचार, बलात्कार इत्यादी घटना घडत असून याकडे लक्ष न देता फक्त सत्तेत राहण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. पण हे शिवसेना खपवून घेणार नाही. भारतीय जनता पार्टी अंगावर येत असेल तर आम्ही शिवसैनिक सिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.
असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना
याप्रसंगी छाया कुंभारे महिला जिल्हा संघटिका, स्मिता नैताम शहर संघटिका, आरती खोब्रागडे शहर संघटिका (प्रभारी), नुतन कुंभारे शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ती, गिता मेश्राम तालुका समन्वयक, सिमा पाराशर शिवसेना महिला शाखाप्रमुख, मंजुळा पदा सरपंच, देवकी कंकड्यालवार शाखा संघटिका, जोसना राजूरकर शाखा संघटिका, संध्या हेमके शाखा संघटिका, धनश्री पवार शाखा संघटिका, सिंधू नेताम दिना शाखा संघटिका, रोहिणी दिक्षीत, शितल ढवळे, नंदू कुमरे, नवनाथ उके, सुमेद चांदेकर आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




