आगीत तनसीचे पुंजणे जळून खाक
भद्रावती :- शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुधोली शेत शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील रचलेल्या तन सीच्या पुंज न्याला आग लागल्याने संपूर्ण पुंज नेच आगीच्या स्वाधीन होऊन शेतकऱ्यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले शेतकऱ्याला प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती तुळशीराम श्रीरामे यांनी केली आहे
मुधोली येथील शेतकरी काशिनाथ शामराव गायकवाड यांचे गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर त्यांच्या मालकीचे शेत आहे या दोन एकर शेतात धानाची रोवणी करण्यात आली होती धानकाढण्यात आले धान काढल्यानंतर याच शेतात पण तन्सी चे पूनजने रचण्यात आले या तनशीतून जनावरांच्या चाऱ्यांची सोय होईल या आशेवर गायकवाड होते परंतु काल 1 फरवरी रोजी बारा वाजताच्या सुमारास अचानक पणे या तनसी च्या पूंजण्याला आग लागल्याने संपूर्ण पुंज नेच जळून खाक झाले आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही दरम्यान जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी सभापती तुळशीराम श्रीरामे यांच्या मार्गदर्शनात काशिनाथ गायकवाड यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे