म.रा.शि.प.जि.गडचिरोलीची सहविचार सभा संपन्न

114

म.रा.शि.प.जि.गडचिरोलीची सहविचार सभा संपन्न

गडचिरोली जि.प्र.

 

दिनांक 24 /7/ 2023 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत निवेदन शासनाकडे पाठविण्यासाठी देण्यात आले.

 

तसेच मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली संघटनेची सहविचार सभा घेण्यात आली. त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सामूहिक समस्या व वैयक्तिक विषयांवर शासन निर्णय व नियमाला अनुसरून सखोल चर्चा करण्यात आली व सभा यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

त्यात सर्व समस्या तातडीने निकाली काढण्यात येईल व ज्या समस्या शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन मा. श्री निकम साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक व मा. श्री नाकाडे साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संघटनेला दिले.

 

सदर सभेस मा. वेतन अधीक्षक माध्यमिक व प्राथमिक व संबंधित कर्मचारी तसेच श्री संतोष सुरावार जिल्हाध्यक्ष,श्री गोपाल मुनघाटे जिल्हा कार्यवाह माध्यमिक, श्री संतोष जोशी जिल्हा कार्यवाह प्राथमिक तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.