शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय
गोदरेज अग्रोव्हेटच्या पाइनाची शेतकऱ्यांना होणार मदत
चंद्रपूर : शाश्वत कापूस उत्पादनासाठी एक छत्री ब्रँडपाइना (PYNA)मध्ये कापूस तण व्यवस्थापन उत्पादने हिटवीड, हिटवीड मॅक्स, मॅक्सकॉट यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना आज मुख्य हंगामात मजुरांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि अतिवृष्टीमुळे हाताने तण काढणे किंवा शेती यंत्राचा वापर करणे कठीण झाले असताना या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी हे नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यात आले आहेत.
गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या (GAVL), पीक संरक्षण व्यवसायाची पाइना (PYNA)ब्रँड उत्पादने कापूस शेतकर्याना त्यांचा प्रति एकर लागवड खर्च कमी करण्यास मदत करू शकतात असे आज कंपनीतर्फे सांगण्यात आले.
GAVLच्या पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजावेलू एनके म्हणाले, “GAVLमध्येआम्ही शाश्वत कापूस उत्पादन पद्धतींना चालना देत शेतीची उत्पादकता आणि नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. कापूस शेतकर्यां्च्या खर्चात लक्षणीय बचत दाखवून देत आमच्या पाइना (PYNA)ब्रँड उत्पादनांसह आम्ही त्यांच्या आर्थिक यशात सतत योगदान देत आहोत. भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे अंतिम ध्येय असल्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि पाइना (PYNA)उत्पादन पोर्टफोलिओच्या छत्राखाली मिश्रण आणि फॉर्म्युलेशनमध्ये नाविन्यता आणत आहोत.”
“पाइना (PYNA)ब्रँडच्या यशाचे श्रेय दोन्ही बहुराष्ट्रीय महामंडळे आणि भारतीय कंपन्या या दोन्ही सह १५ को ब्रँडेड कंपन्याच्या धोरणात्मक सहयोगाला दिले जाऊ शकते. पाइना (PYNA)ब्रँडिंग गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करते आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करते. त्यापुढे जाऊन गोदरेज आणि त्याच्या सह-विपणकांमधील सहकार्य आणखी मजबूत करते,”असेहीते पुढे म्हणाले.
GAVLही २००७ मध्ये हिटवीड हे निवडक कापूस तणनाशक सादर करणारी पहिली कंपनी होती. जमिनीवर कोणताही परिणाम न होता मजबूत वाढीसाठी कापूस रोपांना अधिक जागा, प्रकाश आणि हवा मिळण्यासाठी सक्षम करत हे पेरणीनंतर (DAS) २०-२५ दिवसांनी वापरण्यासाठी विकसित केले गेले. सुरुवातीच्या पोस्ट-इमर्जंट काळ म्हणजेच ७-१५ दिवसांत कापसाच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी २०१९ मध्ये हिटवीड मॅक्स सादर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट पीक सुरक्षितता आणि चांगली कार्यक्षमता मिळू शकली. २०२३ मध्येकंपनीने ०-३ DAS मध्ये वापरण्याचे मॅक्सकॉट हे प्री इमर्जंट तणनाशक सादर केले. ते कापसातील प्रमुख तणांची वाढ दूर करते, कापसाच्या रोपांची चांगली वाढ सुनिश्चित करते आणि मोठ्या तणांचा पुढील प्रसार कमी करते.
उत्पादनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रभावी तण व्यवस्थापन उपायांसह सक्षम बनवत, मजुरांच्या गरजा कमी करण्यासाठी आणि शाश्वत कृषी पद्धतींमध्ये योगदान देण्यासाठी कापूस शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात पाइना (PYNA) ब्रँडसहGAVL महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.



