Home Breaking News *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली ३१जुलै ला बांबू कटाई संदर्भातील समितीची...

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली ३१जुलै ला बांबू कटाई संदर्भातील समितीची बैठक

111

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली ३१जुलै ला बांबू कटाई संदर्भातील समितीची बैठक*

 

*मुख्य वनसंरक्षक कार्यालयात दुपारी ३ वाजता बैठकीच्या आयोजन*

 

 

 

*दिनांक २९ जुलै २०२३ गडचिरोली*

 

*गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांना विश्वासात न घेता होणाऱ्या अवैद्य बांबू कटाई संदर्भातील समस्यांबाबत नेमण्यात आलेल्या समितीची ३१ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वतीने देण्यात आली आहे.*

 

*या बैठकीला समितीचे सह अध्यक्ष आमदार कृष्णाजी गजबे, सदस्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, उपवनसंरक्षक गडचिरोली तथा विभागीय वन अधिकारी दक्षता गडचिरोली वनवृत्त सदस्य सचिव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामसभांना विश्वासात न घेता होत असलेल्या अवैद्य बांबू कटाई संदर्भात वनमंत्री यांचे विधानसभेत लक्ष वेधून घेतले होते. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ही समिती गठीत केली असून या समितीने या संदर्भात पुढील ३ महिन्यात शासनाला अहवाल सादर करावयाचा आहे.*

Don`t copy text!