*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंविरोधात काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक*

73

*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंविरोधात काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक*

 

*ब्रम्हपुरी काॅंग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन*

 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टीकाटिप्पणी करतो ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे. असा आरोप करीत ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी येथील शिवाजी महाराज चौकात भिडेंविरोधात घोषणाबाजी करीत भिडेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, अॅड. गोविंदराव भेंडारकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, बाजार समितीच्या उपसभापती सुनिताताई तिडके, नगरसेविका निलीमाताई सावरकर, बाजार समितीचे संचालक अरुण अलोने, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, माजी सरपंच राजेश पारधी, बाजार समितीचे माजी संचालक वामन मिसार, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, वकार खान, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डि.के. मेश्राम, प्रा. चंद्रशेखर गणवीर, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सतीश डांगे, सुधाकर पोपटे, उपसरपंच गुरुदेव वाघरे, उपसरपंच संदीप बगमारे, सोमेश्वर उपासे, गुड्डु बगमारे, सरपंच सुरेश दुनेदार, विलास धोटे, दत्तात्रय टिकले, मंगला टिकले, माजी नगरसेविका जया कन्नाके, कल्पना तुपट, वंदना ऊईके, पल्लवी मेहेर यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.