कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले.
काँग्रेसने प्रदीर्घ खल केल्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वडेट्टीवार यांच्या रुपात राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यांच्या निवडीबद्दल कांग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला आहे




