राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्या भिडे गुरुजीवर एफ आय आर दाखल करून कार्यवाही करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांची मागणी
*राष्ट्रपिता महात्मा गांधी(बापू) यांचेवर अर्वाच्य भाषेत जनतेच्या भावना दुखावणारी टीका करून सामाजिक सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम करणारे माथेफिरू मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी यांचेवर एफ. आय. आर. दाखल करून कायदेशीर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महामहीम राज्यपाल साहेब राजभवन मुंबई महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे तहसील कार्यालय गडचिरोली चे नायब तहसीलदार माननीय आर. व्ही.तलांडे साहेब यांचे मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी केली आहे*



