*सरपंच ग्रामंचायत पदाधिकारी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार

77

*सरपंच ग्रामंचायत पदाधिकारी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार*

 

*मोदी आवास योजनेतून ओबीसी समाजाला घरकुल योजना ,तलाठी ,वनरक्षक पद भरती मध्ये ओबीसी समाजाला अधिक जागा मिळवून दिल्याबद्दल केला सत्कार*

 

*दिनांक १ ऑगस्ट २०२३ गडचिरोली*

 

*राज्य शासनाने ओबीसी समाजाकरिता घरकुल मिळावे याकरिता मोदी आवास योजना सुरू केल्याबद्दल, व जिल्ह्यातील तलाठी वनरक्षक पदभरती मध्ये ओबीसी समाजाला जागा वाढवून दिल्याबद्दल चामोर्शी तालुका सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला.*

 

*याप्रसंगी श्री भैयाजी वाढई सरपंच, श्री. भास्कर बुरे सरपंच, श्रीमती संगीताताई मोगरे सरपंचां, श्री काशिनाथ बुरांडे उपसरपंच, श्री वसंत चौधरी उपसरपंच, श्री शेषराव कोहळे उपसरपंच, सौरभ पाल उपसरपंच, श्री विठ्ठल सातपुते उपसरपंच, भुवनेश्वर चुधरी सदस्य, संजय चलाख सदस्य, व संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.*