महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणी बैठक शिक्षक भवन नवी पेठ पुणे येथे बैठक संपन्न
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारणी बैठक अध्यक्ष सुनिल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून झालेल्या कार्यवाहीची नोंद घेऊन मंजूर करणे, कोषाध्यक्ष यांचा अहवाल, दिनांक 1/6/2023 ते 29/ 7 /2023 अखेर झालेल्या आजीव सदस्यांची नोंद घेऊन मंजुरात देणे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ बैठकीतील विषयांवर सविस्तर चर्चा करणे, विभाग स्तरावर पालक नियुक्ती बाबत, संघटनात्मक निवडणूका बाबत, विभागनिहाय आढावा बाबत, सभासद नोंदणी अभियान बाबत, संघटनात्मक काम अधिक गतिमान व्हावे म्हणून तयार करण्यात आलेल्या समिती बाबत निर्णय घेणे, राज्य पदाधिकारी यांचा प्रवास आढावा, राज्य अधिवेशन व अभ्यास वर्ग आयोजित करणेबाबत, आंदोलनाबाबत, जुनी पेन्शन आंदोलन तीव्र करणे विभागातुन समिती बाबत प्रतिनिधींची निवड करणे,नाशिक,मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक बाबत, शिक्षक परिषद व अन्य संघटना संबंध बाबत, अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या दोन दिवस झालेल्या सभेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुनिल पंडित सर, राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पुजाताई चौधरी,कार्याध्यक्ष मा आमदार नागो गाणार सर, संघटन मंत्री मा आमदार भगवानराव साळुंखे सर, कार्याध्यक्ष नरेंद्र वातकर सर, कार्याध्यक्ष दिलीप अहिरे सर व सर्व राज्य, विभाग पदाधिकारी उपस्थित होते.





