*भाजपच्या वतीने हस्तकलेद्वारा साड्यावर डिझाईन व वर्क काढणाऱ्या महिलांचा सत्कार*
*जागतिक नॅशनल हँडयुलम सप्ताहानिमित्य उपक्रम*
गडचिरोली :- दि. 6 आगस्ट
*जागतिक नॅशनल हँड्युलम दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर जागतिक नॅशनल हँडयुलम सप्ताह दिनांक ४ ऑगस्ट ते 10 ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात हॅण्डलूम सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दि. 6 आगस्ट रोजी भाजप महिला मोर्चा च्या वतीने गडचिरोली येथे साड्यावर विविध डिझाईन व विविध प्रकारचे वर्क काढणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.*
*याप्रसंगी हस्तकलेद्वारा विविध प्रकारच्या साड्यावर मोती वर्क, थ्रेड, मिरर , जरदारी व चमकी वर्क करणाऱ्या निर्मला श्रीनिवास कोटावार यांचा महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, लक्ष्मीताई कलंत्री शहर महामंत्री वैष्णवी नैताम, पुष्पांताई करकाडे, ओबीसी महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, पुनम हेमके, नंदीनी बंडीवार, सरोजिनी पोचरलावार, हसीना सय्यद, सपना उपाध्ये, वैशाली हुस्के, सुशीला कोटावार, सुनिता मुरमुरवार, मंदाताई आवारी उपस्थित होत्या.*



