*जनतेचे अपेक्षा पुर्ण करन्यासाठी येनार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करन्याचे ध्येयाने काम करा* — *शिवाजीराव झोरे*

61

*जनतेचे अपेक्षा पुर्ण करन्यासाठी येनार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करन्याचे ध्येयाने काम करा* —

*शिवाजीराव झोरे*

—————————————-

मा.पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदेशान्वये,मा.विनायक राऊत साहेब सचिव यांचे नेतृत्वात, मा.प्रकाश वाघ साहेब पुर्व विदर्भ समन्वयक व मा.महेश केदारी साहेब जिल्हा संपर्कप्रमुख यांचे मार्गदर्शनात मा.शिवाजीराव झोरे गडचिरोली विधानसभा संपर्कप्रमुख यांनी विधानसभा क्षेत्रात आढावा बैठका घेतल्या.यावेळेस कनेरी ता.गडचिरोली येथील पदाधिकारी चे बैठकीत मार्गदर्शन करतांना मा.झोरे साहेब म्हणाले की महाविकास आघाडीत मा.पक्ष प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्रि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे अडीच वर्षाचे लोकाभिमुख कार्य राज्यातील जनतेने बघीतले आहे व आताचे नियमबाह्य गद्धार मिंदे सरकारचे कार्य जनता बघत आहे. आज जनता महाविकास आघाडी मधील मा.उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्रि म्हनुन केलेल्या राज्याचे विकासाचे कामाचे आधारे पुनश्च त्यांना मुख्यमंत्रि म्हनुन प्रथम पंसदी देत आहे.तेंव्हा राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पुर्ण करण्यासाठी येनार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय मिळविन्याचे चिकाटी ने काम करन्याचे आवाहन मा.शिवाजीराव झोरे संपर्कप्रमुख गडचिरोली विधानसभा यांनी कनेरी येथील पदाधिकारी चे बैठकीत केले.

यावेळेस विलास कोडापे सह संपर्कप्रमुख,वासुदेव सेडमाके जिल्हाप्रमुख,सुनिल पोरड्डीवार उप जिल्हाप्रमुख,रांजेद्र लांजेकर विधानसभा समन्वयक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बैठकीला घनशाम कोलते तालुका संघटक,तुषार मडावी सरंपच कनेरी,विजय ब्राम्हणवाडे शाखा प्रमुख कनेरी,खोब्रागडे सर,शामराव कोलते माजी संरपच व इतर शिवसैनिक उपस्थित होते.