प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे.

126

🛑 *पदग्रहण समारंभ* 🛑

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील व इतर कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे शुक्रवार (ता. १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे, आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत.

अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनजी जोशी यांनी दिली.

प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून ”अंग्रेजो चलो जावो, भारत छोडो” हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक *ऑगस्ट क्रांती मैदानात* आयोजित कार्यक्रमात पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाना पटोले यांनी (४ फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (५ फेब्रुवारी रोजी) काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता ते (ता. १२ फेब्रुवारी) रोजी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षही पदभार स्वीकारणार आहेत.

पटोलेंना सहकार्य करण्यासाठी सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरीफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणीती शिंदे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे.

याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शिरीश चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.