दिव्यांगा करीता प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या संस्थांकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे : हेमंत गडकरी

64

दिव्यांगा करीता प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या संस्थांकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे : हेमंत गडकरी

 

समाजातील एक घटक असलेल्या मतिमंद,मुक बधीर व इतर दिव्यांग विद्यार्थांसाठी प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांकडे मायबाप सरकारने केवळ निवडणूक जवळ आली की लोकांचे दरवाजे आठविण्यापेक्ष्या इतर वेळीही नक्की लक्ष द्यावे असे आवाहन शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील जागृती मतिमंद निवासी शाळेत राजेश देवतळे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमात विद्यार्थांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.सध्या सरकारचा शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे त्याचा जेवढा गाजावाजा व जाहिराती प्रसिद्ध होत आहे मात्र कृतीत तेवढे गांभीर्य दिसत नाही अश्यावेळी स्थानिक प्रशासनाने दिव्यांगासाठी बोटावर मोजण्याइतक्या ज्या प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या संस्थां आहेत त्यांची दखल घ्यावी असे मत व्यक्त करून राजेश देवतळे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे हेमंत गडकरी यांनी कौतुक केले,यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष शेखर दुंडे मौदा येथील पत्रकार श्री. दयाल नानवटकर दिनेश पात्रे जागृती मतिमंद शाळेच्या शिक्षिका सीमा शेंडे शेषराव भाकरे , सुनील वैद्य,विनायक महाजन,हे प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश देवतळे यांचे सह बंडूभाऊ वाघमारे,योगराज सरोदे,सलमान शेख,गणेश वाघमारे,बन्फुल वानखेडे,नवाब पठाण यांनी परिश्रम घेतले,सोबतच जागृती शाळेचे शिक्षक कुणाल माने,अविनाश मुळे,प्रकाश माहुरे,दर्शन वासनिक,विनोद पानघटे,योगेश घोडीचोर,शैलेश चीमंनकर,योगेश तिजारे यांनीही सहकार्य केले