Home Breaking News *”होमगार्ड युनियन तर्फे आजाद मैदान मुंबई येथे भव्य साखळी उपोषण!!*

*”होमगार्ड युनियन तर्फे आजाद मैदान मुंबई येथे भव्य साखळी उपोषण!!*

89

*”होमगार्ड युनियन तर्फे आजाद मैदान मुंबई येथे भव्य साखळी उपोषण!!*

 

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या तर्फे मुंबई जाण्याकरिता आर्थिक मदत!!*

 

अहेरी : हिवाळी अधिवेशनात मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक होमगार्ड ला 365 दिवसा पैकी 180 दिवस बंदोबस्त कामी ठेवण्यात यावे.असे मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हिवाळी अधिवेशनात ठेवलेले होते,परंतु होमगार्ड कर्मचाऱ्यांनी 365 दिवसा पैकी सुट्टीचे दिवस वागढून वर्षभर काम द्यावे,बेसिक लागू करावा,पेन्शन ह्या मागणी साठी दि. 21/8/2023 पासून आजाद मैदान मुबंई येथे साखळी उपोषणाला बसण्यात येणार असल्याने अहेरी तालुक्यातील होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मुबंई जाण्याकरीता आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

 

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती भास्कर तलांडे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम,माजी उपसरपंच अशोक येलमुले,नरेश गर्गम,रवी भोयर,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थिती होते

Don`t copy text!