*विजयाचा संकल्प हाच भाजपाचा निर्धार!* – चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष भाजपा

112

*विजयाचा संकल्प हाच भाजपाचा निर्धार!*

– चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष भाजपा.

दि.२३ ऑगस्ट २०२३

गडचिरोली/ ब्रम्हपुरी

 

• गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात प्रवास

• मान्यवरांच्या भेटी, कार्यकर्त्यांशी संवाद,

 

मतदारांनी विचारपूर्वक मताचे कर्ज केवळ पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना दिले. हे कर्ज सेवा व सर्मपण व विकासातून केवळ तेच परत करू शकतात हा विश्वास निर्माण झाला असून भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचून विजयाचा संकल्प करावा असे आवाहन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी आज संवाद यात्रा बैठकीत केले.

 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या एक दिवसीय प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्यासोबत गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. गडचिरोलीच्या इंदिरा चौकात प्रदेशाध्यक्षांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी मुख्य बाजारपेठेतून घर चलो अभियानात सहभागी घेतला. गडचिरोलीच्या सुमानंद सभागृहात आरमोरी, अहेरी व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

 

ब्रह्मपुरी येथे शिवाजी चौकातून ते जनसंपर्क अभियानात सहभागी झाले, लोढीया हॉलमध्ये ब्रह्मपुरी, चिमूर व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या दौऱ्यात खासदार अशोक नेते, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, हरीश शर्मा,येशुलाल उपराडे,माजी आमदार अतुल देशकर,माजी राज्यमंत्री राजे अमरीश्रराव आत्राम,माजी आमदार संजय पुराम,धर्मपाल मेश्राम,केशव मानकर,रविंद्र ओल्लालवार, लोकसभा संयोजक प्रमोद पिंपरे, लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे,बाबुराव कोहळे, अरविंद सा.पोरेडडीवार, गोविंद सारडा,प्रकाश गेडाम, रेखाताई डोळस, मुक्तेश्वर काटवे. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

 

• *झाडीपट्टीच्या नटसम्राटाची भेट!*

महाराष्ट्रातील दुर्गम भागात मनोरंजन व समाज प्रबोधनात अग्रेसर असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची गडचिरोली लोकसभा प्रवासात श्री बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. 21 व्या वर्षी नाट्यसृष्टीत पाऊल ठेवणारे सुमारे 800 हून अधिक नाटकातून 5000 भूमिका साकारणारे श्री खुणे हे ‘झाडीपट्टीचे दादा कोडके’ म्हणून प्रसिद्ध आहेत. झाडीपट्टी रंगभूमीची भरभराट व्हावी, त्यास नवी ओळख मिळावी यासाठी गडचिरोली भागात झाडीपट्टी महोत्सव आयोजित व्हावा,अशी मागणी त्यांनी मला केली. या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा करून हा महोत्सव साजरा करू, असा विश्वास त्यांना श्री बावनकुळे यांनी दिला.

 

 

• *विश्वकर्मा योजनेची माहिती*

गडचिरोली येथील चित्रकार दिलीप खडसे यांची भेट घेतली, त्यांना प्रस्तावित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत माहिती दिली. घिसूलाल काबरा, यांची भेट घेत चर्चा केली. ब्रह्मपुरी येथे प्रा. देवेश कांबळे, विजय फटिंग यांची भेट घेतली व विविध विषयावर चर्चा केली.

 

*प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन*

 

खासदार अशोक नेते यांची गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील वार रुमच व शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या हस्ते करून खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.

 

यावेळी चंद्रयान ३ चा यशस्वी लंडिंग झाल्याचा प्रक्षेपण पाहण्यात आला. मान. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या विश्वासात भाजपामध्ये अनेक कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला.