आरमोरी येथे शिवसेना महिला आघाडीचा भव्य मेळावा संपन्न गावा गावात महिला आघाडीच्या शाखा स्थापन करणार
गडचिरोली ..आरमोरी तालुका महिला शिवसेनेच्या वतीने महिला शिवसेनेचा मेळावा गडचिरोली जीप च्या माजी सभापती तथा शिवसेना उपसंघटिका वेणूताई ढवगाये यांनी आयोजित केला होता, या मेळाव्याला गडचिरोली जिल्हा महिला शिवसेना संघटिका छायाताई कुंभारे व त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण गडचिरोली येथील टीम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख भूषण सातव, आनंदसिंग चावला, माजी जीप सदस्य दिगंबरजी मेश्राम,माजी ग्रामपंचायत सदस्य विजयभाऊ मुरवातकर, मेघाताई मने, ज्ञानेश्वर जी ढवगाये, संघटक लहानुजी पिलारे हे प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करण्यात आली.या मेळाव्यात पक्ष संघटना मजबूत करणे तसेच घर तेथे शिवसेना ही संकल्पना राबविण्याचे ठरविण्यात आले तसेच सध्याच्या महागाई मुळे समान्य व गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडलेले असल्यामुळे त्या विरोधात लवकरात लवकर या नाकर्त्या सरकार विरोधात भव्य मोर्चा मोर्चा काढण्याचे ठरले,
तसेच माणिपूर येथे आदिवासी भगिनींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला,कार्यक्रमाप्रसंगी विविध महिलांनी त्यांच्यावर घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगाची जाहीर पणे माहिती दिली, त्यामुळे सभागृहातील वातावरण काहीवेळासाठी भावणीक झाले होते, सत्काराला उत्तर देताना छायाताईंनी सखोल मार्गदर्शन केले, व कुणावरही काही अडचण आल्यास केव्हाही फोन करा, शिवसेना ही सदैव आपल्यासोबत आहे, असं ठासून सांगितले.संचालन सुषमाताई गेडाम यांनी केले,
प्रस्ताविक उपसंघटिका वेणूताई ढवगाये यांनी केले,या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी सुद्धा ज्वलंत मार्गदर्शन केले. व उपस्थित महिलांना आस्वासित केले की शिवसेना उबाठा पक्ष हा सदैव सुखदुःखात अडिअडचणीत सोबत आहे,तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरानी यथोचित मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आरमोरी येथील विविध प्रभागातील शेकडो महिलांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन वेणूताई ढवगाये व छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला,.
या कार्यक्रम प्रसंगी महिला शहरप्रमुख सारिका काबळे, माजी ग्रामपंचायात सदस्य मेघा मने,रजनी भेंडे, सत्यभामा चौके,कुंदाताई करंडे,अर्चना आकरे, भाविका राऊत,लक्स्मी खारकाटे,शशिकला घरफडे व गडचिरोली वरून आलेल्या जोत्स्ना राजूरकर, नूतन कुंभारे, शिल्पाताई ठवरे व शेकडो महिला शिवसैनिक हजर होत्या.




